Sunday, January 24, 2021

आई होणे - एक सुंदर प्रवास 

 आई होणे हा आनंदाचा परमोच्च क्षण असतो आणि तो शब्दांमध्ये मांडणं खरंच अवघड आहे... पण तरीही माझा आई होण्याचा प्रवास शब्दबद्ध करून ठेवावा म्हणून हा खटाटोप! 




Pregnancy चा काळ 

Finally आम्ही ठरवलं की आता बाळ हवंय... डॉक्टरच्या visits, आमचे प्रयत्न चालूच होते त्यामुळेच मी प्रेग्नन्ट झाले तेव्हा माझे मलाच कळलं होते(sixth sense जो प्रत्येक आईला असतो) जे काही दिवसांनी ब्लड टेस्ट ने confirm झालं...     
वैद्य आणि फडके दोन्ही कुटुंब ही बातमी ऐकून आनंदाने बहरून गेली.  माझा बंगलोर स्थित भाऊ तर इतका excite झाला की फोन मधूनच इथे येतोय की  काय असं वाटलं त्याच्याशी बोलल्यावर! 

पहिले बाळ असल्याने डिलिव्हरी मुंबईला करायची हे आमचं आधीच ठरलं होते Throughout pregnancy आमच्या गुणी लेकीने मला काहीच त्रास दिला नाही... उलट्यांचा त्रास पण मला फक्त १५ दिवस झाला..... डोहाळे गोडाचे लागले...मला generally गोड आवडत नाही.... माझा मलाच विश्वास बसत नाहीये आता कि मी अर्धा किलो श्रीखंड एकटीने खाल्लं होते, ice cream चा मोठा डबा एकटीने एका बैठकीत संपवला!! Monthly  gynac check  ups, calcium, iron च्या गोळ्या, जिने चढता उतरताना योग्य काळजी असं सगळे नीट चालू होते... भारतात स्त्री भ्रूण हत्येचे प्रमाण खूप असल्याने गर्भ लिंग निदान बेकायदेशीर आहे, पण इथे तसं काही नाही म्हणून डॉक्टर आधीच सांगतात मुलगा आहे की मुलगी... आमच्या डॉक्टरने विचारले होते आम्हाला जाणून घ्यायचं आहे का मुलगा आहे की मुलगी ते. पण आम्हालाच आधी माहीत करून घ्यायचे नव्हतं..      

हळूहळू घरकाम करणे जड जायला लागलं... मग बाईचा शोध सुरु झाला.... २-३ बायांना call केले पण माझ्या वेळेला म्हणजे संध्याकाळी ७-७.३० ला यायला कोणीच तयार नाही. एका बाईला बाबा-पुता करून तयार केले ...ती एक दिवस आली...दुसऱ्या दिवशी गायब!... विचारलं तर म्हणते ...madam मला तुमच्या घरासमोरचा रस्ता क्रॉस करायला भीती वाटते!!! हे काय कारण असू शकते! शेवटी एका male maid ला ठेवले केर लादी आणि भांड्याना...      

 बघता बघता ७ महिने झाले आणि मुंबईला जायची वेळ आली.. इतके दिवस डॉ.  गीतांजली शाह यांच्या गर्भसंस्कार app मधल्या गोष्टी मी week by week follow करत होते... ८ सप्टेंबर २०१६ ला मुंबई ला आलो. आल्या आल्या १८ च्या रविवारी मी आणि किरणने डॉ गीतांजली यांचा गर्भसंस्कार क्रॅश कोर्स केला..... ज्यामुळे मला खूपच फायदा झाला. आल्यावर डॉ विक्रम शाह यांना दाखवलं आणि त्यांनी सांगितलं expected date २५ ऑक्टोबर असली तरी ९० टक्के तुमची डिलिव्हरी आधीच होईल. माझा जीव भांड्यात पडला...कारण २५ नंतर डॉक्टर स्वतः दिवाळीच्या सुटीवर जाणार होते एक आठवडा! चेक अप नंतर लक्षात आले की हिमोग्लोबिन निदान ११ तरी असायला हवं या स्टेजला...जे माझं ९. ८ होतं . डिलिव्हरीच्या वेळी २ पॉईंट्स हिमोग्लोबिन बाळ घेतं. जर कमी असेल हिमोग्लोबिन तर रक्त चढवायची वेळ पण येऊ शकते!! म्हणून डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार रोज एक अशी ४-५ injections घेतली. ऐश्वर्याची ad पाहून curiocity ने चौकशी केली Stem cell banking ची आणि पटलं म्हणून Lifecell चं package घेतलं. त्यांनी दिलेले kit घेऊन जायचं हॉस्पिटल ला आणि Labour pain सुरु झाल्यावर त्यांना कळवायचे की त्यांचा representative येतो लगेच. 


आल्यावर फीडिंग गाउन, बाळाचा बेड, २ सेट बाळाचे कपडे, diapers, हिमालया बेबी क्रीम असं सगळं घेऊन झालं...बाकी तयारी पण हळूहळू चालू होती... आईने मालिशवाली बाई पण fix केली लगेच...बाळांच्या नावाच्या २ lists बनायला लागल्या..... मुलींची नावं आणि मुलांची नावं .... रोजचं अर्धा पाऊण तास चालणे,रामरक्षा ऐकणे , गाणी ऐकणे , व्यायाम, आरामात पुस्तके वाचणे आणि आईच्या हातचे सुग्रास जेवण....अजून काय पाहिजे..... मज्जानु life....       

मी आले तेव्हा ८ वा महिना चालू होता आणि मग पितृपक्ष...त्यामुळे डोहाळजेवण करता आलं नव्हतं म्हणून ९ वा लागल्यावर सगळ्यांची सोय पाहून घरच्या घरी  शनिवार ८ ऑक्टोबर २०१६ ला डोहाळ जेवणाचा बेत आई बाबानी आखला. सगळ्यांना कळवलं. फुलांची आणि फुलांच्या दागिन्यांची ऑर्डर देऊन झाली... मेनू ठरला.... पण ..... पण आमच्या लेकीला जामच घाई झाली होती आमच्यात यायची! 

आई पद बहाल झालं तो दिवस 

 
५ ऑक्टोबर ला रात्री मी toilet ला जायला उठलेच नाही.. ६ तारखेला सकाळी ७ वाजता toilet ला गेले आणि बघते तर bleeding झालेलं!! लगेच आई आणि मी निघालो डॉक्टर ना दाखवून येऊया म्हणून.... आई बाबा टॅक्सी मागवण्याचा लगबगीला लागले... तेव्हा मीच म्हटले की "कशाला उगाच टॅक्सी.... मला काही होत नाहीये....  नुसतं दाखवून यायचंय डॉक्टरांना" बाबांना बाहेर काम होतं... त्यांनाही म्हटलं जाऊन या तुम्ही आम्ही दाखवून येऊ लगेच... चालत चालतच गेलो हॉस्पिटल मध्ये.. ८ वाजता पोचलो. डॉक्टर पूर्णिमा आल्या आणि त्यांनी मला आतून तपासलं... त्यांनी सांगितलं की गर्भाशयाचं तोंड उघडायला सुरुवात झालीये. आपण काही वेळ मॉनिटर करूया ३-४ तास... प्रत्येक केस वेगळी असते..काहींचं गर्भाशय लगेच अजून उघडायला लागतं तर काहींचं काही दिवसांनी उघडतं. 

एका कॉट वर मी बसले. पेपर वाचला. जरा झोप काढली. मग नवरोबाला - किरणला कॉल केला आणि सांगितलं की असं असं  दवाखान्यात आहे...थोड्या वेळाने सोडतील कदाचित....आई म्हणाली अगं सकाळी असेच आलो आपण गडबडीने...मी घरी जाऊन पटकन ब्रेकफास्ट बनवून आणते तुझ्याकरता...भूक लागली असेल ना... मी म्हटलं चालेल..आण... आईने मस्त शेवयांचा उपमा करून आणला...मी छान चापून खाल्ला...त्यानंतर मात्र मला बेड वर झोपता येईना...मी पडले रे पडले की प्रचंड "uneasy" वाटायला लागायचं. थोडा वेळ हा प्रकार चालला. मी येरझाऱ्या घालू लागले तिथल्या तिथे आणि आई मला धीर देत होती. नंतर मला संडासला जावेसे वाटू लागलं. आईचा हात धरून ३-४ वेळा खेपा घालून आले...पण उपयोग शून्य! आता मात्र मला धीर धरवेना... मी डॉक्टरना बोलवा असा हट्ट केला आणि पूर्णिमा डॉक्टर ना सांगितलं की आता पुरे ... मला गोळी द्या एखादी संडासला होईल अशी.... मला हा प्रकार नाही सहन होत आहे. त्या पटकन आल्या आणि त्यांनी गर्भाशय परत तपासले आणि लगबगीने हालचाली सुरु केल्या. मला मात्रं काय करू म्हणजे बरं  वाटेल हे कळेना.... आईला सोबत घेऊन toilet ला गेले. जरासा जोर करू लागले... तेवढ्यात अश्विनी हॉस्पिटलच्या मावशी आल्या आणि खेचतच मला बाहेर आणले.... म्हणाल्या " जरा कळ काढ की पोरी! इथेच होईल बाळ नाहीतर!" आई अनुभवी असली तरी तिला माझी तगमग पाहवेना आणि काय करावे कळेना... 
पूर्णिमा डॉक्टर आल्या आणि त्यांनी सांगितलं की डिलिव्हरी आहे तुझी आता .... अरे बापरे! झाली ना पंचाईत! असं काही होईल असं वाटलंच नव्हते... चेक-अप झाला की घरी येऊ लगेच म्हणून असेच आलो होतो आम्ही....हात हलवत ....  Lifecell चं kit तर घरीच राहिलं होतं... आई जाऊ शकत नव्हती मला सोडून आणि बाबाही बाहेर होते.... आई ने बाबांना कॉल केला आणि लवकर यायला सांगितलं. नशिबाने Dr. शाह यांच्याकडे Lifecell चं दुसरे kit होते. ते म्हणाले तू कॉल कर त्यांना या लगेच म्हणून. माझ्याकडचे kit वापरू आपण... नंतर तू तुझं kit आणून replace कर. 

मला झोपायला सांगितलं आणि कसलंसं injection दिलं आणि मग movie मध्ये होते तसं सगळं धूसर झालं ..... बहुदा मला operation theatre मध्ये नेलं असावं.... मी अर्धवट ग्लानी मध्ये होते... मधेच डॉक्टर्स चे बोलणे ऐकू येत होते - ते माझ्याशी बोलतायत की एकमेकांशी हेही नीट कळत नव्हते.... थोडक्यात माझी "मैं कहाँ हूँ ?" स्थिती झाली होती .... तेवढ्यात "push कर , come on ..push ..one last push" कानावर पडलं आणि हे मलाच सांगितलंय हे ध्यानात आलं आणि सगळा जोर काढून केलं push ! मी पूर्ण थकले होते पण माझे कान आसुसले होते ऐकायला की बाळ छान सुखरूप आहे...." Congratulations संजीवनी ! तुम्हाला मुलगी झालीये आणि छान आहे ती !" मोठ्या प्रयत्नानं मी डोळे उघडे ठेवले होते आणि ते शब्दं ऐकून मात्र तृप्तं मनाने डोळे मिटले. माझ्या लेकीला इतकी घाई होती यायची की माझे  बाबा गिरगावहून टॅक्सीने  यायच्या आत  ही आली की बाहेर! ते सुद्धा मला अजिबात त्रास न होता! काही बायका २४-२५ तास प्रसव वेदना सहन करतात!! 
माझ्या आईने आमच्या लाडूबाईला  सर्वात पहिल्यांदा उचललं आणि तिच्या कानात गायत्री मंत्र म्हटला....    
   

Friday, May 29, 2020


एखाद्याची मिस डाउटफायर होणे 

साधारण १५ वर्षांपूर्वीची गोष्टं आहे . एका नामांकित आंतरराष्ट्रीय वेल्थ मॅनॅजमेन्ट कंपनीमध्ये माझी "पहिली नोकरी" सुरु झाली. माझ्या टीम मध्ये आम्ही विशी -पंचविशीतले  पाच जण होतो. सगळेच उत्साहाने भरलेले आणि कामं करताना टिंगल टवाळी करून ताण हलका करणारे! 
४-५ महिन्यात मी नीट रुळले. एके दिवशी दोन नवीन मेंबर्स आमच्या टीम मध्ये जॉईन झाले. त्यांना कामं समजावून देताना काही दिवसांनी आम्हा पाच जणांच्या लक्षात एक गोष्टं आली. ही नवीन मुलगी -नेहा आम्हा पाचही जणांना एकच प्रश्नं विचारून मिळालेली माहिती पडताळून पाहत असे. "कंटाळा आला तर ब्रेकआऊट एरिया मध्ये जाऊन मशीन मधून चहा/कॉफी/दूध  पिऊन १०-१५ मिनिटांनी परत काम चालू करू शकतो. त्यासाठी कोणाचीही परवानगी लागत नाही." अशा गोष्टींपासून "एखाद्या जुन्या ग्राहकाच्या विशिष्ट सूचना, चालू प्रकल्पाच्या अंतिम मुदतीची तारीख" अशा गोष्टींपर्यंत सगळ्या गोष्टींची ती ५ जणांकडून खात्री करून घ्यायची. आम्हा सगळ्यांना सुरुवातीला राग आला, पण नंतर ह्याचीच आम्ही गंमत करायला लागलो. यादरम्यानच रॉबिन विल्यम्सचा "मिसेस डाउटफायर" आम्ही २-३ वेळा पहिला. त्याचा परिणाम म्हणूनच कदाचित आम्ही नेहाच्या वागण्याला  "मिस डाउटफायर होणे" (सतत डाउट घेणारा /घेणारी) असे म्हणू लागलो. कोणी चुकूनही एकच गोष्ट दोघा -तिघांना विचारली, तर "तुझी  मिस डाउटफायर व्हायला लागली आहे बरं का!" हा वाक्प्रचार आमच्यात रूढ झाला.
विमान प्रवास बंद झाला तर..... 

आज आपण सगळेच global citizens झालो आहोत. आज काही गोष्टी आपल्या  इतक्या अंगवळणी पडल्या आहेत की कधी काळी आपण त्याशिवाय सुद्धा अगदी व्यवस्थित जगू शकत होतो हे  सहज आठवतच नाही आपल्याला!   Mobile phone, विमान प्रवास या सगळ्या गोष्टी यातच मोडतात. मला आजही स्पष्टं आठवतायत बाल्कनी मध्ये येरझाऱ्या घालत माझ्या बाबांची वाट पाहणारे "no mobile era " मधले माझे आजोबा....  

विमान प्रवासामुळे खऱ्या अर्थाने जग जवळ आलंय. प्रवासामुळे आलेल्या विविध अनुभवांमुळे आज आपण अधिक समृध्द झालोय असं म्हटलं तर वावगं ठरू नये... आज कोरोना व्हायरसमुळे सगळं जग थांबलंय , ठप्प झालंय.... सगळ्यांचा विमान प्रवासच नव्हे तर प्रवासच बंद झालाय....अशा वेळी हा विचार मनात आला की आता  जर विमान प्रवासच  बंद झाला तर काय होईल ? कल्पनेनेच मनात धस्सं झालं. रावापासून रंकापर्यंत सगळ्यांवरच याचा परिणाम दिसेल.   

वैयक्तिक दृष्टीने म्हणाल तर आमचं "मधू इथे आणि चंद्र तिथे झुरतो अंधारात" चालूच राहील...... (मी मुंबईला आणि नवरोबा मस्कतला ) दुसरं म्हणजे आमच्या पोटावरच पाय येईल!... कारण माझा नवरा aviation industry मध्ये काम करत असल्याने त्याला परत शून्यापासून काहीतरी सुरु करावे लागेल. आणि फक्तं माझा नवराच नाही तर लाखो लोकांच्या रोजी रोटीवर डायरेक्ट परिणाम होईल. Pilots,  Cabin crews , Airport ground staff, Dispatchers, Air Traffic Controllers, Aviation Experts, Air Cargo Segment Industry मध्ये काम करणारे लोकं  - सगळ्यांनाच काहीतरी वेगळं career शोधावं लागेल, जे कदाचित अतिशय अवघड आणि आव्हानात्मक असेल. आपण काही आकडेवारी पाहूया या क्षेत्राची एकूण व्याप्ती लक्षात येण्याकरता. IATA  ने प्रकाशित केलेल्या एका अहवालानुसार २०१० मध्ये ७.९ करोड लोकांनी भारतात, भारतामधून किंवा भारताअंतर्गत प्रवास केला. २०१७ पर्यंत हा आकडा दुप्पट झाला आणि १५. ८ करोड झाला. हवाई दळणवळणाचा भारतीय अर्थव्यवस्थेत सिंहाचा वाटा आहे. भारतीय Aviation sector ७५ लाख लोकांना पोसतो. जवळपास ४ लाख डायरेक्ट रोजगार , साधारण ६ लाख रोजगार संलग्न क्षेत्रांमध्ये आणि ६२ लाख रोजगार Tourism क्षेत्रामध्ये.         

सर्वाधिक फटका कोणाला बसणार असेल तर तो  आहे Tourism Industry ला ! "Best of Europe", "Jewels of Spain", "Norway in a nutshell" , "Ultimate USA " अशा सगळ्या टूर्स चक्कं गायब होतील ना ! अर्थात बोटीने प्रवास करण्याचा मार्ग खुला असेल, पण  "Foreign Tour"चं सगळ्यांचं planning कोलमडेल. आपापल्या देशात बस आणि ट्रेनने प्रवास करण्यासारख्या ठिकाणीच सुट्टी घालवता येईल. पर्यायाने इथेही लाखो लोकांच्या नोकरीवर गदा येईल. IT companies, Import-Export companies  च्या कामावरही मोठा नकारात्मक परिणाम दिसून येईल. प्रादेशिक ऑफिसेस असलेल्या कंपन्यांना कर्मचाऱ्यांच्या प्रवासाची वेगळी सोय करावी लागेल, म्हणजेच जास्त वेळ दवडावा लागेल प्रवासात.... Foreign investments वर पण लक्षणीय परिणाम दिसून येईल. मागील काही वर्षात "Medical tourism"ने आपले हातपाय पसरले आहेत. त्यावरही गंभीर नकारात्मक  परिणाम दिसून येतील.       

बऱ्याच जणांना कदाचित माहिती असेल की प्रत्येक देश दुसऱ्या देशाच्या airline ला आपले हवाई क्षेत्रं वापरण्याबद्दल काही शुल्क आकारतो. ठराविक सेवा कर, पार केलेले अंतर आणि विमानाचे वजन या सगळ्या बाबींवर हे शुल्क अवलंबून असते. तुम्हीच कल्पना करा या शुल्काची.  या Airbus किंवा Boeing ची प्रवासी विमानं सरासरी २५० टनांची असतात. आपण सरासरी भारतीय हवाई क्षेत्रं २५०० किमी चे धरू. एका उड्डाणाचे साधारण ५०,००० होतात. परतीच्या उड्डाणाचे अजून ५०,०००. साधारण १ लाख रुपये - केवळ एका विमानाच्या उड्डाणाचे!! विमानप्रवास बंद झाला तर हा महसूल पूर्ण बंद होईल.....थोडक्यात काय, संपूर्ण अर्थव्यवस्था  दहा पावलं मागे जाईल असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरू नये.  

आजकाल आपले बरेच नातेवाईक आणि मित्रमंडळी अमेरिका, लंडन, जर्मनी अशा देशांमध्ये असतात. विमान प्रवास बंद झाला तर त्यांच्या  फक्त "virtual भेटीवरच " समाधान मानावे लागेल. वयोवृद्ध पालक अक्षरशः झुरतील मुलांच्या भेटीकरता!!  पालक हल्ली मुलांना प्रगत देशांमध्ये शिक्षण देण्याची स्वप्नं पाहतात आणि पूर्ण सुद्धा करू शकतात..... ती सगळी स्वप्नं भंगून जातील! आपल्याकडच्या आरक्षण, राजकारण, फसवेगिरी अशा सगळ्या गोष्टींनी भरलेल्या "Business of Education" मध्येच पालकांना कुठेतरी सुवर्णमध्य शोधावा लागेल. आपल्याकडचे "Student Exchange" प्रोग्रॅम्स बंद पडतील.      

मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रावरही दूरगामी प्रभाव पडेल. चोप्रा कंपनीला परदेशी जाऊन शुटिंग्स करता येणार नाहीत! कदाचित दर्जेदार low budget फिल्म्स आपल्याला पाहायला मिळतील. कलाकारांचे "live कार्यक्रम ", नाटकांचे परदेश दौरे  मात्र होऊ शकणार नाहीत. कलाकार मंडळींची "Destination Weddings" पण देशातल्या देशातच करावी लागतील की बिचाऱ्यांना .....   क्रीडा क्षेत्राचं म्हणाल तर विम्बल्डन, वर्ल्ड कप, जागतिक बुद्धिबळ स्पर्धा , ऑलिम्पिक अशा  आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये आपल्या खेळाडूंना भाग घेता येणार नाही. विमान प्रवास नसेल तर कदाचित अशा स्पर्धांचं आयोजनच केलं जाणार नाही! आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण तर फार लांबची गोष्ट वाटू लागेल.  बाहेरची स्पर्धा किंवा  तुलना नसल्याने आपल्या खेळाडूंचा स्तर खालावण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

एकच सकारात्मक गोष्ट मला यातून दिसत्ये ती म्हणजे हवाई अपघात आणि अपहरण प्रकरणे थांबतील. परंतु तुलना करता ती खरंच इतकी आहेत का?  कदाचित नाही.               
 
विमान प्रवास बंद झाला तर साधारणपणे नकारात्मक परिणामच अधिक होतील असे वाटतंय. परंतु जेव्हा एक दरवाजा बंद होतो तेव्हा माणूस बाकीचे दरवाजे ठोठावण्याचा प्रयत्न नक्कीच करतो आणि तसा आपणही सर्वजण तो करू. त्यातूनच कदाचित काही बाबतीत आपण अधिक चांगले पर्याय शोधून काढू. उदाहरणार्थ ,  शिक्षणाचा दर्जा कायम ठेऊन actual classroom आपण virtual classroom मध्ये रूपांतरित करू शकतो . Live concerts चं परिवर्तन E - concerts मध्ये करता येईल. पण ही एक शक्यता आहे केवळ! 

म्हणूनच म्हणते  तात्पुरता विमान प्रवास बंद झाला तर चालेल एकवेळ, पण कायमचा? नक्को रे बाबा!

         

Tuesday, July 6, 2010

A Memorable Day – The wrong way……

Normally speaking, we cherish and remember some days as we experience immensely happy moments on those special occasions. But, I remember this particular day vividly for all the weird and wrong reasons….

We had a function in our family, a Ring ceremony, to be very precise, on 22nd May. It was at Pune. All four of us (Mom, Dad, me and my brother) planned what all to carry, what to wear on 21st May. The topic of one of our “heated conversations” was “when to wear the function clothes”. Gen Y opined that we should carry function clothes and wear them after we arrive at the desired Hall; as it was summer time. However, other side wanted to wear only one pair of clothes and they were fine with getting themselves drenched in the river of sweat with the same clothes on!!! Thus, all of us followed our hearts and decided to go on our own ways. A suitcase was packed with clothes of both of us. Next day early morning we all were ready. Me in a new Punjabi suit stitched for daily use and my brother in T shirt and pant. My parents, all set for the function… Me and my mom left home first, as mom walks a little slow because of her knee problem. Of course we gave all the necessary instructions like “Lock the door properly” etc. to dad and my brother and left for the station with a handbag with us. We met them just outside the station, as we had the tickets in our handbag. We went to the platform and started chit-chatting, while waiting for the train. Suddenly, my brother screamed “Where is our bag??”..it was not there!!!! We went about on the platform to check.. but in vain! Then we realized, no one has taken the suitcase while leaving home…. We thought they will take it and they thought we took it!!! Wow!!! And within 5 minutes our train was due for arrival!!! Thankfully, nothing else like cash, return tickets etc. was in the suitcase… so then our very first task after getting down at Pune station was to buy a shirt for my brother. My dress seemed kind of alright….

Ambience of the shops near Pune station were so third-class, that we did not feel like even entering into those. Finally we went into a ‘somewhat ok’ looking shop and bought a nice shirt for him. He immediately changed into the new shirt. Now our search for the auto to our destination began…. Meanwhile, my ‘designer shoes’ started indicating that they are breathing their last breath!! Sole of the shoe bid me goodbye and our desperate hunt for a shoe shop began. Luckily for me, after tottering for 10 minutes, we found a shoe shop and got the shoes and caught an auto without further ado. But, as fate would have it, we had missed half the ceremony……

Saturday, January 9, 2010

Expressing through Poems


We make friends with poems very early in our lives. In the form of nursury rhymes, poems take us to a different world. Later, as we grow, we try to comprehend poems to score marks.Then comes teenage stage, when almost everyone becomes a poet.... It is then when we truly understand and feel the words in a poem.
Poems come to our rescue after a couple of heartbreaks. By this time, during this entire journey, we indeed start enjoying poems! We start having fun interpreting a poem from various angles.Friends might walk in and out of our life. However, this companion stays with us through thick and thin to cheer us.

I still remember when I wrote or rather “made” my first poem… My singing teacher wanted us all to write a poem. It was a homework for us. I was in ninth standard. I and my brother, both of us sat down and wrote down all the rhyming words that came to our minds at that time. We literally picked up one – one word and “made” the poem somehow…It sounded “the best” at that point in time… I laugh at it when I read it now… No no.. I don’t intend to share it here and ask everyone to make sense out of it( coz it’s a tough task..), rather, I would share this poem, which I wrote for “someone special” when I was in 11th…. But unfortunately(or could be, fortunately) .. never gathered courage to express it in front of that “special someone”…

कब चुराया आपने दील, पताही नाही चला हमें
कब उडाई नींदें रातोंकी खबर्ही नहीं हुई हमें
छोटी
छोटी बातें आपकी यूँ दील पे छाने लगी
मानो
, हर एक अदा आपकी हमें अच्छी लगने लगी
देखते ही देखते दीन पर लगाकर उड़ गए
धीरे
धीरे हम एक दुसरे के और करीब आ गए
फैसला
कीया है अब हमने आपके साथ चलने का
वादा
करो आज हमसे,जिन्दगीभर ये साथ नीभानेका..





Saturday, January 2, 2010

Five point someone and Three idiots

I don't know if it happens to you guys. Characters in the fiction take visual shape in my imaginary mind while I read it. Of course this depends on the ability of the writer to form such strong characters. When I first read “Five point someone”, I really liked it, not because it had typical “goody goody ” ending. It was because of the fact that Chetan Bhagat took me to the entirely different world of engineers and hostel life. Though I have never experienced the things described in the book, I could relate to it very well. I think that’s the success of any writer.He should be able to take you there wherever he goes. Habitually, I created my own Ryan, Hari and Alok in my imaginary world. I was kind of afraid that probably “3 idiots” would be different than what I have imagined and would not do justice to the book. “Hello” could not do justice to “One night @ call centre” and failed miserably. Even in case of Harry Potter series, I feel that book is hundred times better than the movies, as movies cannot cover everything in it.

But believe me, when I watched 3 Idiots, I got a pleasant surprise!! It was incredible, though it has the required brainless “hindi movie masala”, wherein one has to literally remove and keep aside his thinking cap. Storyline has been altered a bit, but it matched the picture I created in my mind. Also, there are very few movies, where the casting is so perfect that you can never imagine anyone else playing that character. All characters including the cute young child who played “young Rancho” are so very fit in their roles, that I cannot imagine anybody else playing those now. Madhavan and Sharman were simply fabulous at some places. Even “Chatur” touched my heart. Kareena and Boman were marvelous, as usual. I would also like to appreciate script-writer and the dialog writer of the movie. They have done a fantabulous job! Converting a novel into a three hour movie is not a child’s play. Songs like “Behti hava sa “, “Give me some sunshine”, “Zubidubi” supported the storyline very well. I guess this song “Aal Izz Well” should be the theme song for all MBA students, as great students like us start working only when our tail is on fire and at that time, we really need someone to tell us “All Izz well”, so that we acquire courage to face the consequences of our “deeds”. It is not “the perfect” or “the ultimate” film, but it serves the purpose of entertaining and at the end of it, it makes you pause for a while and ponder over what you just saw.

All said and done, we (by “we”, I mean “Student Community”) cannot deny the fact that the movie has certain straight-forward and certain latent messages for us and we “must” pay heed to what it conveys. In fact, we have heard it many times, but now it has got a new outlook….”Kamiyaab hone ke liye nahi Kabil hone ke liye padho…. Excellence ka peecha karo, success zak marko tumhare peeche aayegi…” .. so true… isn’t it?..Doesn’t this refer to the fantastic saying “Karmanyevadhikaraste Ma Faleshu kadachan”. I am gonna give it a thought…. What say?

Thursday, December 3, 2009

Indian Standard Timing

“Indian Standard Timing”

When we think of a time, a watch comes in front of the eyes. Nowadays we have so many places where we get the watch. Almost everybody wears a wrist watch (though not necessarily for the purpose of looking at the time). Everybody has a mobile which has a watch (even an alarm!). We Indians are very good at giving appointments i.e. promising a particular time and failing to honour the commitment. I have not seen (in many years) any programme which has commenced on its scheduled time.
Even weddings get delayed! I can tolerate and understand a delay of 5-10 minutes, but any delay beyond that is not forgivable. (According to me. People may differ). I consider time as the most valuable asset. It even overpowers money. Once gone, you cannot recover it, how much ever you bang you bang your head and repent. So I have this “bad habit” of reaching 10 minutes early at the venue. As fate would have it, my best friend reaches the desired location exactly after half an hour delay.I remember one special incident when I reached the reception hall at 7.30pm as mentioned in the invitation card, and to my great surprise and dismay, bridegroom and bride arrived at 8.30pm!
Nowadays, some people take pride in coming late. They feel their “value” increases if they “appear to be busy”! I understand delay on account of crazy Mumbai traffic, but at times people don’t even have the courtesy to inform that they would reach late! The real paradox lies in the fact that these people( who do not value time) expect others to be on time without fail…
Trains should be on time, newspaper should come on time, salary should be paid on time, tailor should give the cloths on time…. and the list goes on and on…
Actually, I wonder what happens on time in our country? Elections happen anytime apart from its scheduled time, various exams get either preponed or postponed. Results get delayed, so admissions get delayed. Courts never pass their judgments on time. People who are supposed to get hanged do not get hanged on time…… that’s I think “IST”. All these things are “man-made”, so to say. But nature.. even nature does not follow the seasonal cycle…. Total seasonal cycle has changed now… we have summer in winter, winter in summer and rains in winter!! We have adopted many qualities and we blindly follow many habits of Brits(including the words “sorry” and “thank you”, which are today used when you feel like saying it and not really when you really mean it) , except their total commitment to follow and value time…..